Standard-2nd.
-----------------------
Topic-Let's observe the picture & tell what the persons in the picture is doing .
-------------------------------------------------------------------
Activity-Teacher asks students some questions about the action of persons in the picture & students responds as you see in the video shared below...
-------------------------------------------------------------------
DO WATCH & COMMENT PLEASE...
-------------------------------------------------------------------
|
---|
Wednesday, August 30, 2017
Preparing students to learn "S+is/am/are+V4+O" structure.
Sunday, August 27, 2017
इंग्रजी वाचनपूर्वतयारी इयत्ता १ व २
गतवर्षी इ.१ली व २रीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची इंग्रजी वाचनपूर्वतयारी कशी करून घेतली होती ते या संपादित ध्वनीचित्रमुद्रणात बघा.. |
---|
Friday, August 25, 2017
Monday, August 21, 2017
STANDARD-2: INTRODUCING & USING 'DO+V1' &/ 'DON'T+V1' STRUCTURE IN CONVERSATION
Standard-2nd & 3rd. Topic-'Do+V1' & 'Don't+V1' sentence structure. Activity-As you see in the video shared below. Do watch,like,comment and share please. |
---|
Thursday, August 17, 2017
नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशनचे workbook
नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशन
टीमकडून - इयत्ता सहावी ते आठवीच्या मुलांसाठीचे पायाभूत उच्च प्राथमिक गणित हे वर्कबुक वेबसाइटवर अपलोड केले आहे. नेहमीप्रमाणे ते मोफत डाउनलोड करता येईल आणि noncommercial उद्देशांसाठी वापरता येईल. अनेक शाळा सेमीइंग्रजी असल्यामुळे एक प्रयोग म्हणून ते इंग्रजी-मराठी bilingual केले आहे. सहावी ते आठवीच्या सर्व मुलांना ते उपयुक्त आहे. सातवी आणि आठवीच्या अभ्यासक्रमातील पायाभूत संकल्पना यात आहेत. काही संकल्पना यात नाहीत. त्यांच्या पुस्तिका पुढील सत्रात तयार होतील. नववी-दहावीतील ज्या मुलांचा पाया कच्चा आहे त्यांनाही हे पुस्तक उपयुक्त आहे. ज्या शिक्षकांना स्वतःला गणिताची भीती वाटते त्यांनी हे पुस्तक स्वतः सोडवावे. तुमच्या अनुभवाचा आम्हाला आणखी सुधारणा करण्यात नक्की फायदा होईल. Bilingual वर्कबुकचा हा पहिला प्रयोग आहे. त्याबाबतचा अनुभवही कळवावा.
Download करण्यासाठी पुढील पिवळ्या चौकटीतील लिंक ला click करा.
-गीताताई महाशब्दे, संचालिका नवनिर्मिती लर्निंग फाऊंडेशन.
|
---|
Monday, August 14, 2017
WE LEARN ENGLISH..26 March 2016 ची फेसबुक वर प्रसारित केलेले टीपण.
गतवर्षी विद्यार्थ्यांनी अर्थपूर्ण वाक्यनिर्मितीसाठी पुढील Gramatical Senetense Construction सूत्रे अभ्यासली होती. १.S+V1+O २.S+V2+O ३.S+shall/will+V1+O ४.S+is/am/are+V4+O ५.S+was/were+V4+O ६.S+shall be/will be+V4+O ७.S+has/have+V3+O ८.S+had+V3+O ९.S+shall have/will have+V3+O १०.S+has been / have been+V4+O ११.S+had been+V4+O १२.S+shall have/will have+been+V4+O ही सूत्रे शिकत असताना विद्यार्थ्यांना ताण येणार नाही याची पुरेपुर काळजी मी घेतली होती. याबाबत सविस्तर वर्णन पुढे दिलेले आहे. गतवर्षी इयत्ता ३री, ४थी व ५वीच्या विद्यार्थ्यांनी एकुण इंग्रजीतील १२ Grammatical Senetense Constructions अभ्यासल्या होत्या. हा व्याकरणाचा भाग असल्याने प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना नियमादि बाबी समजावून सांगणे तसे अवघड काम असल्याची जाणीव होतीच परंतू इंग्रजी पाठ्यपुस्तकातील गद्यपाठ शिक्षकानेच पारम्पारिक पद्धतीने म्हणजे शब्दार्थ लिहून देवून ते मुलांना घोकंपट्टी करायला सांगणे तथा समग्र पाठाचे स्वतःच (शिक्षकाने) भाषांतर करून आशय कथन करण्यापेक्षा वा समजावून सांगण्यापेक्षा विद्यार्थ्यांनाच स्वयंअध्ययन करून शब्दांचे अर्थ शब्दकोशातुन स्वतः शोधण्याची व तो पाठ/घटक समजून घेण्याची/समजावून सांगण्याची सवय लागली तर ते भाषा शिकण्या/समजून घेण्याच्या अंगाने अधिक परिणामकारक ठरेल असे मला वाटले व पूर्ण विचारांती इंग्रजी वाक्यरचनेची १२ सूत्रे (Sentence Construction formulae /Tenses) शिकण्यास / समजून घेण्यास व त्यायोगे वाक्यनिर्मिती करता येण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम मी हाती घेतले. हे करत असताना व्याकरणातील कोणत्याच संज्ञांचा (SUBJECT,OBJECT, VERB इत्यादि..) उल्लेख मुद्दाम करायचा नाही असे ठरवले. शिकणं निरस व कंटाळवाणं होऊ नये हाच यामागील हेतू. माझ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासलेली इंग्रजी वाक्यराचनेची १२ सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत. त्यातील पाहिले सूत्र [ S+V1+O ] शिकण्यासाठी वर्गात केलेल्या प्रयत्नांचा विस्तृत उहापोह या post मध्ये करीत आहे...आपले अभिप्राय अपेक्षित आहेत. - Sentence construction formulae - १.S+V1+O २.S+V2+O ३.S+shall/will+V1+O ४.S+is/am/are+V4+O ५.S+was/were+V4+O ६.S+shall be/will be+V4+O ७.S+has/have+V3+O ८.S+had+V3+O ९.S+shall have/will have+V3+O १०.S+has been / have been+V4+O ११.S+had been+V4+O १२.S+shall have/will have+been+V4+O यातील पहिली रचना (S+V1+O) आम्ही अशी शिकलोत. सर्वप्रथम मुलांना माहीत असलेले मुख्य कृती/क्रियादर्शक इंग्रजी शब्द (मुख्य क्रियापदाचे पहिले रूप-V1) मराठी अर्थासह (त्यांनाच विचारून) एका खाली एक अशा क्रमाने फळ्य़ावर लिहून घेतले. उदाहरणार्थ- --------------- [V1] --------------- eat/eats ,-खातो/खाते/खातात go/goes ,-जातो/जाते/जातात write/writes,-लिहितो/लिहिते/लिहितात read/reads,-वाचतो/वाचते/वाचतात walk/walks-चालतो/चालते/चालतात Come/comes-येतो/येते/येतात Play/plays-खेळतो/खेळते/खेळतात Drink/drinks-पितो/पिते/पितात make/makes-बनवतो/बनवते/बनवतात Take/takes-घेतो/घेते/घेतात Cut/cuts-कापतो/कापते/कापतात Open/opens-उघडतो/उघडते/उघडतात Close/closes-बंद करतो/करते/करतात मुद्दाम eat म्हणजे 'खाणे' ऐवजी 'खातो/खाते/खातात'... go म्हणजे 'जाणे' ऐवजी 'जातो/जाते/जातात' याप्रमाणे सर्व क्रियादर्शक शब्दांचे (V1s चे) अर्थ फळ्यावर लिहिलेले होते. त्यामुळे अर्थपूर्ण वाक्यनिर्मिती करणे सोपे जाणार होते कारण वाक्ये लिहिताना वा बोलताना आपण 'खाणे' किंवा 'जाणे' असे शब्दप्रयोग आपण करीत नाही. वरीलप्रमाणे यादी करून "ह्या सर्व शब्दांना V1 म्हणायचं"..असे सांगितले आणि शीर्षस्थानी "V1" लिहून सबंध यादी चौकटीत बंद केली... आता वरील शब्दांच्या संदर्भाने मी काही प्रश्न मुलांना विचारले.त्यापैकी एक पुढे दिला आहे. उदाहरणार्थ- १.'कोण' जातो ? ....(मुलांचे उत्तर- 'मी' जातो...'तो' जातो...ती जाते...ते जातात...'रवी' जातो...आरती जाते...आम्ही जातो...) ... मग मी 'मी' साठी इंग्रजी प्रतिशब्द 'I' फळ्य़ावर लिहिला. (अर्थातच मुलांना परिचित असलेल्या शब्दांचीच एकाखाली एक अशी क्रमवार यादी करून शीर्षस्थानी 'S' लिहिले व सबंध यादी चौकटीत बंद केली. मुलांनी " 'कोण' जातो ? "या प्रश्नाचे उत्तरादाखल सांगितलेल्या सर्व मराठी शब्दांना इंग्रजी प्रतिशब्दांसह तयार केलेली नमुना यादी पुढे देतोय. ------------- *[S]* -------------- मी-I तो-He ती-She ते/त्या/ती-They आम्ही/आपण-We रवी-मुलाचे/माणसाचे नाव आरती-मुलीचे/स्त्रीचे नाव इ त्या दि. अशाप्रकारे आता फळ्यावर *'V1' व 'S'* या दोन शब्दयाद्या लिहिल्या गेल्या. आता फळ्यावर *S+V1+O* हे सूत्र लिहिले आणि मुलांना वर लिहिलेल्या *'S' व 'V1'* च्या यादीतील शब्द या सूत्रात योग्य क्रमाने लिहायला सांगितले. मुलांनी सुत्रातील क्रमानुसार *S व V1* च्या यादीतून योग्य शब्द निवडून अचूक वाक्यरचना केली. पण O च्या जागी काय लिहायचे हे आधी सांगितलेले नसल्याने मुले थांबलीत..'O' म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी मी *'S+V1'* या क्रमाने विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या अपूर्ण वाक्याच्या अनुशंगाने एक प्रश्नावली तयार केली. त्यातील एक प्रश्न उदाहरणादाखल पुढे देतोय. मुलांनी *[S+V1]* या शब्दक्रमाने लिहिलेले वाक्य होते. *I go*...(मी जातो/जाते.) मी विचारलेला प्रश्नावलीतील मराठी प्रश्न होता..."'कोठे' जातो ?" मुलांनी विविध उत्तरे दिलीत. उदा.शाळेत जातो/जाते. बाजारात जातो/जाते/ कायगावला जातो/जाते...इत्यादि. ज्यावेळी पहिले उत्तर आले 'शाळेत जातो/जाते' तत्क्षणीच मी फळ्यावर *I go*नंतर *to school*..हा शब्दसमुह लिहिला. (to,for,at,on,in under....इत्यादि prepositions चे अर्थ वेळोवेळी कृतियुक्त अध्ययन अनुभवांच्या माध्यमातून पहिल्या सत्रातच स्पष्ट केलेले होते...याविषयी स्वतंत्र लिहिनच.) आता फळ्या वर वाक्य लिहिले गेले ते पुढीलप्रमाणे- *I go to school*....(मी शाळेत जातो/जाते किंवा शाळेला जातो/जाते.) मग मी मुलांना विचारले,"सूत्रात बघून मला सांगा या वाक्यातील *'to school'* या शब्दसमुहाला आता तुम्ही काय म्हणाल ?" मला अपेक्षित असलेले उत्तर मुलांकडून आले,"सर, *'to school'* हा या सुत्रातील *'O'* आहे." इथे मुलांचे पूर्वज्ञान होते...फळ्यावरील *'S'* व *'V1'* यादीतील शब्द. त्यामुळे सुत्राखाली लिहिल्या गेलेल्या वाक्यातील *I*(S) *go* (V1) नंतर लिहिलेला "to school" हा शब्दसमूह नक्कीच *'O'* असणार हे त्यांना निरिक्षणातून लक्षात आले होते. त्यानंतर वरील वाक्यात *V1* (go) व *O* *(to school)* कायम ठेवून केवळ' I 'बदलून S च्या यादीतील दुसरे शब्द वापरून विद्यार्थ्यांना वाक्यरचना करावयास सांगितले. विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे वाक्ये लिहिलीत. १.I go to school....मी लिहून दाखवलेले मुळ वाक्य. २.He goes to school....विद्यार्थ्यांनी मी लिहिलेल्या मुळ वाक्यातील ' I ' हा *'S'* बदलून त्याजागी ' *He* ' हा *S* वापरून लिहिलेले वाक्य. *३*.She goes to school....(She चा वापर) ४.They go to school...(They चा वापर) ५.Ravi goes to school.(मुलगा/पुरुषाच्या नावाचा वापर) ६.Arati goes to school.(मुलगी/स्त्रीच्या नावाचा वापर) याप्रमाणे विविध इंग्रजी वाक्ये मराठी भाषांतरासह लिहिली. [ यात *go* व *goes* किंवा *cut व cuts* यापैकी कोणते रूप कोणत्या *S* पुढे वापरायचे हे समजण्यासाठी आधीच काही तक्ते तयार करून मुलांना अभ्यासण्यासाठी दिलेले होते. उदाहरणार्थ- *I go / I cut* *You go / You cut* *We go / We cut* *They go / They cut* *He goes / He cuts* *She goes / She cuts* *It goes / It cuts* *Ravi goes / Ravi cuts* *Aarati goes / Aarati cuts ]* त्यानंतर वाक्यातील *S* कायम ठेवून *V1* व वाक्याला अर्थपूर्णता येईल असा *'O'* वापरून विद्यार्थ्यांकडून नियमितपणे वाक्यनिर्मिती करून घेत गेलो. मुले आनंदाने हे सारं करीत होती...अर्थपूर्ण वाक्य लिहिलेल्या वह्या रोज मला दाखवित होती...आताही हा नित्यक्रम सुरूच असतो...आनंदाने शिकलोत आम्ही _*S+V1+O*_ही पहिली वाक्यरचना... आणि त्यापुढील उर्वरित ११ वाक्यरचनाही..! पाठ्यपुस्तकातील *मुख्य क्रियापदे [V1] व त्यांची उर्वरित ३ रूपे *[..V2..V3..V4]*यांचेही तक्ते मी स्वतः तयार केले तसेच विद्यार्थ्यांकडूनही तयार करून घेतले..वर्गाच्या भिंतीवर डकवले...रोज वर्गात आल्यावर फावल्या वेळेत माझे विद्यार्थी या तक्त्यातील शब्द अभ्यासतात..व उर्वरित ११ वाक्यरचनेच्या सुत्रांच्या मदतीने अर्थपूर्ण वाक्यांची निर्मिती करतात... पाठ्यपुस्तकात असलेल्या गद्यपाठातील वाक्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी व एकंदरीत सबंध पाठाचा आशय समजण्यासाठी शिकलेल्या या साऱ्या बाबींचा उपयोग त्यांना होत आहे...हे मी सध्या अनुभवतोय. -अभिप्रायाच्या प्रतिक्षेत- *गजानन बोढे,सहशिक्षक, जि.प.प्रा.शा.भानुसेवस्ती, ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद.* |
---|
Saturday, August 12, 2017
आम्ही इंग्रजी असे शिकलो..(१२/०८/२०१६ ची फेसबुक पोस्ट)
मागील वर्षात आजच्याच दिवशी 4 थी व 5 वीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी शिकणे फेसबुक वर प्रसारित केले होते...तीच पोस्ट इथे देतोय |
---|
यंदा ४ थी व ५ वीत शिकत असलेले माझे विद्यार्थी इंग्रजी विषयाचा अभ्यास पुढीलप्रमाणे करतात. १.सम्बंधित इयत्तेतील सर्व विद्यार्थी त्या इयत्तेचा शब्दकोष (Reader) व पाठ्यपुस्तक घेवून चटईवर गट करून वर्तुळाकार बसतात.(प्रत्येक वर्गाची पटसंख्या सरासरी 6-7 अशी असल्याने प्रत्येक इयत्ता म्हणजे एक गट सहज बनतो) २.पाठ्यपुस्तकातील गद्यपाठाचे वाचन करतात. ३.पाठाचे पूर्ण वाचन झाल्यानंतर परत एक एक वाक्य वाचून त्यातील अर्थ न समजलेले शब्द शब्द्कोशात शोधतात. जे शब्द त्यांच्याजवळील शब्द्कोशात नसतील ते वहीत तक्त्याच्या स्वरूपात (word board activity) लिहितात व त्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी माझ्याकडे येतात. ४.Word board मधील शब्दांचा अर्थ माझ्याकडून समजून घेतल्यानंतर वहीत लिहून घेतात. या व शब्द्कोशातील शब्दांच्या अर्थांच्या आधारे पाठातील प्रत्येक वाक्यांचा अर्थ स्वतः लावतात व मला सांगतात...जिथे चुक झाली तिथेच शक्यतो त्यांच्याच मदतीने दूर करण्याचा माझा प्रयत्न असतो...आणि अनुभव असा आहे की मुलेच परस्परांच्या मदतीने चुक दुरुस्ती करून घेतात...क्वचितच ते याकामी माझी मदत घेतात. ५.पाठातील प्रत्येक वाक्यांचा अर्थ सांगून झाल्यानंतर परत सबंध पाठ वाचून काढतात...व पाठाचा समग्र आशय कथन करतात. गतवर्षी या विद्यार्थ्यांना हसत खेळत ताणविरहित वातावरणात gramatical sentence constructions सुत्रांच्या मदतीने अर्थपूर्ण वाक्यनिर्मितीचा सराव करून घेतला होता...त्याचे उपयोजन पाठातील वाक्यांचा अर्थ आणि एकंदरीत संपूर्ण पाठ समजून घेण्यासाठी माझे विद्यार्थी करीत आहेत असे माझे निरिक्षण आहे. *गतवर्षी विद्यार्थ्यांनी अर्थपूर्ण वाक्यनिर्मितीसाठी पुढील Gramatical Senetense Construction सूत्रे अभ्यासली होती.* १.S+V1+O २.S+V2+O ३.S+shall/will+V1+O ४.S+is/am/are+V4+O ५.S+was/were+V4+O ६.S+shall be/will be+V4+O ७.S+has/have+V3+O ८.S+had+V3+O ९.S+shall have/will have+V3+O १०.S+has been / have been+V4+O ११.S+had been+V4+O १२.S+shall have/will have+been+V4+O ही सूत्रे शिकत असताना विद्यार्थ्यांना ताण येणार नाही याची पुरेपुर काळजी मी घेतली. कशी ते लवकरच लिहितो...तूर्तास थांबतो. |
Thursday, August 10, 2017
Let's learn English..Std-2.
WE LEARN ENGLISH. STD-2nd. TOPIC-INTRODUCING SIMPLE PRESENT TENSE ( SENTENSE MAKING & Oral recitation,reading & writing ) ACTIVITY-
Teacher suggests students to write what they do everyday
from the morning to
the night in their notebook.
But the condition is that they should write the name of the act they do in one word using their mother tongue.
For example-As you see in the following image,
Gaurav has written one of the act as,
"झाडावर चढतो.."
Here, I've suggested him to write a name of the act,"चढतो" only.( ie.one word only..)
IN THIS WAY,
YESTERDAY,all the students from standard 2nd,had made a list of acts they do everyday as per my suggestion,within half an hour..Each student wrote 20-25 words in their notebook..
Then, it was the time to tell the ENGLISH WORD for each marathi word they wrote in their copy.
I,myself took the copy of each student & wrote the ENGLISH WORDs (with same meaning for Marathi words they written) front to the MARATHI WORDS & told them to study all these words well at home.This was the homework for them.
TODAY,
When I entered in the classroom,students requested me to take the recitation of all the words with their meanings that they studied at home yesterday as a part of their homework.
Me too,was very eager to test them how they studied these words...I took their oral test & they all get passed in it..
Then,
I wrote all the words (verbs) on the blackboard one below the other & Labeled the whole list as' V1' at the top .
My students from STD 2nd knows all the 'S's (SUBJECTS) very well as they studied in the last year during daily communications & performing preplanned language learning activities in the classroom.
So today It made very easy for them to make simple sentences in "S+V1" structure..(ie.SIMPLE PRESENT TENSE)
See this image..
Here I'm going to share a video ( recorded today in the classroom) of one of my students named BHARATI, in which you can see how she gives expected response.. |
---|
Wednesday, August 9, 2017
Tuesday, August 8, 2017
Let's learn COMPARISON of the numbers..
Std 1st & 2nd...Semi English.
या संबोधाच्या सुलभीकरणासाठी फरशीवरील पुढील रेखाटनाची मदत झाली. 【】 Less than 【】 【】 Greater than【】 【】 is equal to 【】 मुलांना वरील रेखाटने असलेल्या फरशीजवळ घेऊन गेलो.काय शिकणार आहोत याची कोणतीही कल्पना जाणीवपूर्वक मी मुलांना दिली नाही. मुलांना मी जे करणार आहे त्याचे निरीक्षण व मी जे बोलणार आहे ते काळजीपूर्वक ऐकण्याची सुचना करून पुढील कृती करायला मी सुरुवात केली.. मुलं उत्सुकतेने हे सारं बघत होती. कृतीक्रम पुढीलप्रमाणे 👇 ●पहिल्या रेखाटनाच्या डाव्या चौकटीत काही कवड्या ठेवल्या... त्यापेक्षा जास्त कवळ्या उजव्या चौकटीत ठेवल्या...आणि पुढीलप्रमाणे वाचले... "【】 is less than 【】 ●दुसऱ्या रेखाटनाच्या डाव्या चौकटीत काही कवळ्या ठेवल्या त्यापेक्षा कमी कवळ्या उजव्या चौकटीत ठेवल्या... आणि वाचले. 【】is greater than【】 ●तिसऱ्या रेखाटनाच्या डाव्या चौकटीत काही कवळ्या ठेवल्या.. तितक्याच कवळ्या उजव्या चौकटीत ठेवल्या...आणि वाचले... "【】 is equal to【】 " बराच वेळ अशा पद्धतीने तीनही रेखाटनाच्या प्रत्येक चौकटीतील कवळ्यांची संख्या बदलून वाचन करत गेलो व पाठोपाठ पोरांनाही म्हणायला सांगितले. पुरेसा वाचन सराव झाल्यानंतर पोरांना तीन्ही रेखाटनाच्या विविध चौकटीत मांडलेल्या कवळ्यांचे निरीक्षण नोंदवायला सांगितले. पोरांनी नोंदवलेली निरीक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. 👉[पहिल्या रेखाटनाबाबत मुलांनी नोंदवलेले निरीक्षण] ◆डाव्या चौकटीतील कवळ्यांची संख्या उजव्या चौकटीतील कवळ्यांच्या संख्येपेक्षा कमी आहे. 👉[दुसऱ्या रेखाटनाबाबत मुलांनी नोंदवलेले निरीक्षण] ◆डाव्या चौकटीतील कवळ्या उजव्या चौकटीतील कवळयांपेक्षा कमी आहेत. 👉[तिसऱ्या रेखाटनाबाबत मुलांनी नोंदवलेले निरीक्षण] ◆डाव्या आणि उजव्या चौकटीतील कवळ्यांची संख्या सारखी आहे. पुरेसा वाचन सराव झालेला असल्याने मुलांनी वरील सर्व रेखाटनाच्या चौकटीत ठेवलेल्या कवळ्यांच्या संख्यांच्या आधारे पुढीलप्रमाणे सहज वाचन केले... 【】 Less than【】 【】greater than【】 【】 Equal to 【】 उच्चारलेल्या शब्दांच्या अर्थाचे आकलन झाले किंवा नाही याची चाचपणी करण्यासाठी पुढील प्रश्न विचारले. 1) आपण 【】Less than【】 असे कां बरं वाचले? मुलांचा प्रतिसाद-"कारण कि डाव्या चौकटीत कमी कवळ्या आहेत उजव्या चौकटीतील कवळ्यांपेक्षा..!" 2) आपण 【】Greater than 【】 असे कां बरं वाचले? मुलांचा प्रतिसाद-"कारण कि डाव्या चौकटीत जास्त कवळ्या आहेत उजव्या चौकटीतील कवळ्यांपेक्षा..!" 3) आपण 【】Equal to【】 असे कां बरं वाचले? मुलांचा प्रतिसाद-"कारण कि डाव्या व उजव्या चौकटीतील कवळ्यांची संख्या सारखीच आहे..!" (या ठिकाणी 'Less than' म्हणजे 'पेक्षा कमी'...Greater than म्हणजे पेक्षा अधिक...आणि Equal to म्हणजे सारखे/समान...हे पोरांच्या सहज लक्षात आले...मला पोरांना मराठी प्रतिशब्द सांगावा लागला नाही..निरीक्षणातून मुलांनी वाचलेल्या/उच्चारलेल्या या शब्दांचा अर्थ स्वतः शोधला) अशा पद्धतीने आम्ही COMPARISON शिकलोत. 😊 -गजानन बोढे,स.शि.जि.प.प्राथ.शाळा भानुसेवस्ती टाकळी जि. |
---|
Sunday, August 6, 2017
इयत्ता २ री (सेमी इंग्रजी). घटक-SLIDING & ROLLING.
इयत्ता २ री (सेमी इंग्रजी).
घटक-SLIDING & ROLLING.
.................................................
इयत्ता २ रीच्या गणित पाठ्यपुस्तकात असलेले FLAT surface व CURVED surface हे संबोध विविध वस्तुंच्या सहाय्याने पोरांना आधीच समजावून सांगितले होते. पूर्वज्ञानाचा हाच धागा पकडून आपण आता काय शिकणार आहोत याची पूर्वकल्पना न देता मधल्या सुट्टीत घसरगुंडीजवळ खेळत असलेल्या लेकरांजवळ गेलो.इयत्ता २ रीतील पोरांपैकी एकाला घसरगुंडीवर चढण्यास सांगून आधी पुस्तक (an object with FLAT surface) घसरपट्टीवरून खाली सोडण्याची सुचना केली.
त्यानंतर एक खडू (an object with CURVED surface) आडवा ठेवून घसरपट्टीवरुन सोडण्यास सांगितले.या दोन भिन्न surfaces असलेल्या वस्तुंच्या घसरपट्टीवरून खाली येण्याच्या पद्धतीचे निरिक्षण करावयास सागून त्यात काही फरक दिसलाय का ते पोरांना विचारले..पोरं विचार करु लागलीत..शेवटी जीवनने अचूक निरिक्षण नोंदवले.तो म्हणाला,"सर,पुस्तक खाली येताना पट्टीला घासत आले,परंतु खडू मात्र गोल गोल फिरत पट्टीवरुन खाली आला..!"
...यावरुन घसरपट्टीवरुन/उतारावरुन एखादी वस्तू घासत येण्याला SLIDING अन् गोल गोल फिरत येण्याला ROLLING म्हणतात हे सांगितले...सोबतच FLAT surface असलेल्या वस्तू SLIDING करतात अन् CURVED surface च्या वस्तू ROLLING करतात
हे या कृतीदरम्यान पोरांच्या लक्षात आले ते पुढील प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडूनच काढून घेतल्यामुळे.
Q1-What surface do a BOOK have?
Ans by students-FLAT surface.
...................................................
Q2-BOOK घसरपट्टीवरुन कशा प्रकारे आले?
Ans by students-SLIDING करत.
...................................................
Q3-What surface do a chalk have?
Ans by students-CURVED surface.
...................................................
Q-4-CHALK घसरपट्टीवरुन कशा प्रकारे आले?
Ans-ROLLING करत.
...................................................
पोरांना हे संबोध समजलेत की नाही याची चाचपणी करण्यासाठी पुढील प्रश्न विचारले.
Q-5-SLIDING करत येणारे OBJECTS सांगा?
Ans by students-कंपासपेटी,फरशीचा तुकडा,वीट,वही...
...................................................
Q5-ROLLING करणारे OBJECTS सांगा.
Ans by students-बॉल,बैलगाडीचे चाक,पाण्याची बॉटल,जेवणाचा डबा,पोळ्या लाटण्याचे लाटणे.
...................................................
...अशाप्रकारे मधल्या सुट्टीत खेळासोबतच पोरांचे 'शिकणे'ही घडले.

Let's learn multiplication.
Standard-2nd. Topic-Multiplication. Activity-As you see in the video shared below. Before going to learn Multiplication, these students have practiced to make multiplication tables using various things available in the classroom... Obviously I helped them to do so...& Today I got the expected leaning outcomes that made me feeling so happy to share with you all here. Do watch,like,comment and share please. |
दि.२१/०३/२०१६ रोजीची प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शेजारील तालुक्याच्या शिक्षकांची शाळाभेट
दि.२१/०३/२०१६ रोजी फुलंब्री तालुक्यातील विविध जि प शाळांमधील ०८ शिक्षकांनी माझ्या शाळेस भेट दिली.
सर्वजण अपरिचित त्यातल्या त्यात तालुक्याबाहेरील शिक्षकांनी माझ्या शाळेला भेट देणे हा माझ्यासाठी पहिलाच अनुभव होता.
माझ्या शाळेला भेट देण्यासाठी सोयगाव/फुलंब्री तालुक्यातील काही शिक्षक येणार असल्याचे मा.गाडेकर साहेबांकडून जेव्हा मला कळाले तेव्हा जरा या अनपेक्षित धक्क्याने पुरता गोंधळून गेलो होतो.
कारण नवोपक्रमशील/रचनावादी शाळांच्या भेटीच्या नियोजनात जिल्हा शिक्षण विभागाकडून अंतिम करण्यात आलेल्या यादीत माझ्या शाळेचे नाव असेल याची मी कल्पनाही केली नव्हती.
कारण नवोपक्रमशील/रचनावादी शाळांच्या भेटीच्या नियोजनात जिल्हा शिक्षण विभागाकडून अंतिम करण्यात आलेल्या यादीत माझ्या शाळेचे नाव असेल याची मी कल्पनाही केली नव्हती.
कसे होईल,येणारी मंडळी कोणत्या व किती अपेक्षा बाळगून येतील हे सारं अज्ञात होतं.
ज्या शाळा/केंद्र/बीट १००% प्रगत झाल्यात किंवा ज्यांनी तसे घोषित केले होते अशाच शाळा/केंद्र/बीटांना भेटी देण्याचे नियोजन असावे अशीच माझी समज होती.
मी कधीच माझी शाळा १००% प्रगत झाल्याचा दावा वा घोषणा केलेली नव्हती (त्यादृष्टीने प्रयत्न मात्र सुरु आहेत...प्रयत्नांना यश येईलही असा विश्वास वाटतो पण किती कालावधीत हे यश पदरी पडेल हे मात्र निश्चितपणे आता सांगता येऊ शकणार नाही..)
त्यामुळे माझ्या शाळेचे नाव यादीत येईल असे वाटले नव्हते.
त्यामुळे माझ्या शाळेचे नाव यादीत येईल असे वाटले नव्हते.
पण जेव्हा मी नियोजन यादी बघितली तेव्हा त्यात माझ्या शाळेचे नाव बघून आश्चर्यच वाटले.विश्वासच बसत नव्हता माझा यावर..असो!
तरीही या अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जाण्याचे ठरवून घेतले...(त्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हताच.)
पूर्वानुभव नसल्याने गोंधळलेल्या मनस्थितीतच काल रविवार असूनही शाळेत गेलो.
त्यासाठी शनिवारी रात्रीच ४ थीत शिकणाऱ्या रवी व रोहनला (जे वस्तीच्या दोन विरुद्ध टोकांना राहतात) त्यांच्या पालकांच्या भ्रमणध्वनीवरून संपर्क केला व सांगितले कि आपल्या शाळेवर सोमवारी (२१ मार्च २०१६) दुसऱ्या तालुक्यातून काही शिक्षक तुमचे आतापर्यंतचे शिकणे समजून घेऊन तुमचे कौतुक करण्यासाठी येणार आहेत.
तुमच्या घराजवळील मित्र-मैत्रिणींनाही सांग कि बोढे सर रविवारी वर्ग घेणार आहेत म्हणून..!

रोहन , रवीने जो प्रतिसाद मला फोनवर दिला ते ऐकून माझी मानसिक गोंधळावस्था निवळली...जरा relax feel करू लागलो.कारणही तसेच होते.
ते दोघेही म्हणालेत,"सर,तुम्ही आम्हाला good news दिलीत... आम्ही तयार आहोत..उद्या (रविवारी,२० मार्च २०१६) सर्वांना घेऊन शाळेत येतो...!"
ते दोघेही म्हणालेत,"सर,तुम्ही आम्हाला good news दिलीत... आम्ही तयार आहोत..उद्या (रविवारी,२० मार्च २०१६) सर्वांना घेऊन शाळेत येतो...!"
त्यांच्या बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास होता.त्यामुळे माझ्या मनातील अस्वस्थता कमी झाली.
ठरल्याप्रमाणे रवी व रोहनने वस्तीतील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत रविवारच्या वर्गाचा निरोप पोहचवला.
एकूण २८ पैकी २३ विद्यार्थी रविवारच्या वर्गाला हजर राहिले.
सर्वांना सोमवारी शाळेस भेट देण्यास येणारे पाहुणे कोणकोणते प्रश्न विचारू शकतील याची कल्पना दिली.
त्यादृष्टीने तयारी करून घेतली.
आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण शिकलोत त्याचे सादरीकरण स्वतः विद्यार्थ्यांना उपस्थितांसमोर करता यावे यादिशेने मुलांना मार्गदर्शन केले.
शिकलेल्या भागाची उजळणी करून घेतली..पुरेसा सराव झाल्याची खातरजमा झाली व रविवारचा हा विशेष वर्ग संपला.

आज सोमवार उजाडला... आज २८ पैकी २६ मुले उपस्थित होती.
कार्तिक हा इयत्ता २ री तील विद्यार्थी त्याच्या मामाच्या लग्नासाठी म्हणून मागील तीन दिवसांपासून गेलेला होता.त्याचीच इयत्ता ४ थीत शिकत असलेली बहीण रुपाली आज बाहेरील पाहुणे शाळाभेटीसाठी येणार असे कळल्याने तिच्या आजीसोबत मामाच्या गावाहून परतली होती.कार्तिक मात्र त्याच्या मम्मी-पप्पांसोबत तिकडेच राहिलेला होता.
पण आश्चर्य असे कि त्याला राहवले नसावे...तो त्याच्या पप्पांसोबत उशिरा शाळेत हजर झाला.
त्याचे पप्पा सांगत होते कि शाळा बुडते,अभ्यास मागे राहतो म्हणून तो रडायला लागला व शाळेत पोहचवून द्या म्हणून जिद्द करू लागला..त्यामुळे तडकाफडकी तयारी करून त्याच्या जिद्दीपोटी आम्ही गावाहून परतलो.
हे ऐकून मनोमन मी सुखावलो.
विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयीची आवड/ओढ निर्माण झाल्याचे बघून कोणत्या गुरुजींना आंनद होणार नाही.?
आपण करत असलेल्या कामाचं ते सुखद फलित असल्याची ही अनुभूती होती.
ग्रेट मुलांनो ग्रेट!!!

नियोजनाप्रमाणे आमच्या केंद्रप्रमुख आदरणीय भडिकर मॅडम शाळेत आधीच उपस्थित झालेल्या होत्या.
Projector screen वर इंग्रजी शब्दवाचनाची ppt सुरू होती..मुलं शब्द वाचत होती...दरम्यान ११.०० वाजता शाळेत फुलंब्री तालुक्यातील ०८ पाहुण्यांचे आगमन झाले.सोबत केंद्रीय मुख्याध्यापक मा.पवार सरदेखील होते.
"Welcomes all of you..." असे सर्व विद्यार्थ्यांनी एकसुरात म्हणत पाहुण्यांचे स्वागत केले.
सर्वांना आसनस्थ होण्याची विनंती केली..व शाळेतील उपक्रमांचे सादरीकरण प्रत्यक्ष मुलांच्या कृतियुक्त सहभागाच्या आधारे प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थितांसमोर केले.

सुरुवात इंग्रजी विषयाच्या सादरीकरणाने झाली.
Ppt त संग्रहित केलेले शब्द माझ्या मदतीशिवाय इयत्ता १ली व २रीची मुले स्वतःच सहज कशी वाचतात हे उपस्थितांनी प्रत्यक्ष अनुभवले.
टाळ्या वाजवून मुलांचे साऱ्यांनी कौतुक केले.
त्यानंतर ३ ते ५ वी तील मुले त्यांनी शिकलेल्या english sentence constructions च्या मदतीने वाक्यनिर्मिती कशी करतात ते अनुभवले.
नमुन्यादाखल काही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे विशिष्ट construction मध्ये वाक्य तयार करून सांगितले तर काही विद्यार्थ्यांनी त्याच वाक्याचे दुसऱ्या construction form मध्ये वाक्याचे अर्थासह रूपांतरण करून दाखवले..पुन्हा टाळ्या वाजवून माझ्या चिमुकल्यांचे कौतुक उपस्थितांनी केले...खूप बरे वाटले.

त्यानंतर
इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांनी One digit number पासून Nine digit numbers पर्यंतचे अंककार्डाच्या व फरशिवरील रेखाटनाच्या मदतीने वाचन करून दाखवले.
पुढे दिलेल्या number मधील प्रत्येक digits च्या place values मुलांनी लिहून दाखवल्या...दिलेल्या numbers चे expanded form लिहून दाखवले... दिलेल्या दोन numbers मध्ये comparison करून विविध चिन्हांचा (less than, greater than, is equal to..) वापर करून वाचन करून दाखवले.

Additions,subtractionsची उदाहरणे विविध प्रतिकांचा उपयोग करून सोडवून दाखवलीत.
विशेष म्हणजे दशकोटीपर्यंतच्या संख्यांचे वाचन,expanded forms, comparisons,Additions with carrying over तथा without carrying over इत्यादी घटकांचे प्रात्यक्षिक १ लीतील चिमुकल्यांनी करून दाखवत उपस्थितांची मने जिंकली... टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी माझ्या शाळेतील लेकरांचं
कौतुक केलं.

३ री,४ थी व ५ वीच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांनी दिलेल्या तीन शब्दांच्या आधारे गोष्ट तयार करून सादरीकरण केले.
"देव दगडात नसून माणसात असतो"...हा गाडगेबाबांचा संदेश देणारे नाट्यीकरण ४ थी ५ वीतील रोहन,रवी,दिवेश सौरभ,विशाल या चिमुकल्यांनी करून दाखवले.
.......................................
एकंदरीत गुणवत्ता उत्तम असल्याचे मनोगत उपस्थितांनी व्यक्त केले.
पण तरीही ०५ मुलांनी अद्याप अपेक्षित क्षमता प्राप्त केलेल्या नाहीत...पैकी ०३ मुलं हळूहळू प्रगती करत आहेत...०२ मुलांवर विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे....तेही शिकु शकतील हा विश्वास आहे...प्रत्येक मूल शिकु शकतं हे समजायला लागलंय स्वानुभवातून...पण त्यासाठी पुरेसा अवधी हवाय अन् शासन प्रशासनाने तितका अवधी द्यावा ही रास्त अपेक्षा आहे...कारण प्रत्येकाची शिकण्याची गती भिन्न असते हे वास्तव नाकारून चालणार नाही.
जोपर्यंत ही ०५ मुलं त्या त्या वर्गाच्या अपेक्षित किमान अध्ययन क्षमता प्राप्त करणार नाहीत तोपर्यंत मलाही परिपूर्ण समाधान लाभणार नाही...अन् मीदेखील समाधानी नाहीय.
आजवर एकूण पटापैकी २-४ मुलं 'अप्रगत' असली तरी एकंदरीत शाळेची गुणवत्ता उत्तम असल्याचे समाधान वाटायचे पण आज मात्र भावना याउलट आहेत....
जोपर्यंत ही ०५ मुले पूर्णतः शिकती होणार नाहीत तोपर्यंत माझ्या मनाची अस्वस्थता एक शिक्षक/सुलभक म्हणून संपणार नाही हे इथे प्रामाणिकपणे नमूद करावेसे वाटते.
जोपर्यंत ही ०५ मुले पूर्णतः शिकती होणार नाहीत तोपर्यंत माझ्या मनाची अस्वस्थता एक शिक्षक/सुलभक म्हणून संपणार नाही हे इथे प्रामाणिकपणे नमूद करावेसे वाटते.
अर्ध्या हळकुंडात पिवळे होणे ही माझी वृत्ती नाही..
'चट मंगनी पट ब्याह...' या उक्तीप्रमाणेच
'चट उपक्रम पट गुणवत्ता' हेही शक्य नाही.
'चट मंगनी पट ब्याह...' या उक्तीप्रमाणेच
'चट उपक्रम पट गुणवत्ता' हेही शक्य नाही.
कामाची चांगली सुरुवात झालीय हे खरंय पण अजून खूप करायचे बाकी आहे याचीही नम्र जाणीव आहे.
पुन्हा एकदा इथे प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते,
माझी शाळा
१००℅ 'प्रगत' झालेली नाही.
१००℅ 'प्रगत' झालेली नाही.
पण त्यादिशेने प्रयत्न सुरू आहेत...सुरू राहतील हे मात्र निश्चित.
आजच्या सादरीकरणात सहभागी झालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा नामोल्लेख इथे करायचा राहून गेलाय.
एकंदरीत मुलं त्यांच्या त्यांच्या गतीने शिकत आहेत...त्यांना शिकताना बघून आम्ही गुरुजी आंनद घेत आहोत.
.......................................
.......................................
Let's learn Expanded form...Standard-1st & 2nd.
Expanded Form of the number.
Std 1st & 2nd...Medium-Semi English.
Std 1st & 2nd...Medium-Semi English.
दोन अंकी संख्येचा Expanded Form लिहिण्यासाठी फरशीवर पुढीलप्रमाणे रेखाटन केले.
【】=【】+【】
【】=【】+【】
सर्वप्रथम '=' sign च्या डावीकडील चौकटीत आधी Tens ची प्रतीके व लगोलग Units ची प्रतीके ठेवली.
उदाहरणार्थ:
Tens ची 6 प्रतीके व Units ची 7 प्रतीके सदर चौकटीत ठेवली.
Tens ची 6 प्रतीके व Units ची 7 प्रतीके सदर चौकटीत ठेवली.
मुलांना माझी सुचना होती..."Read the number & Write it in your notebook..!"
"67 (sixty seven)..!" पोरांनी ही number वाचून वहीत लिहिली.
आता त्याच चौकटीतील आधी Tens (6) ची प्रतीके उचलली व '='sign च्या पुढे असलेल्या पहिल्या चौकटीत ठेवली.
"Read the number & write it in your notebook..!"मुलांना पुन्हा माझी सुचना.
मुलांनी प्रतिकातून तयार होणारी number वाचली [6 Tens=60 या प्रमाणे] व वहीत आधी नोंदवलेल्या 【67】पुढे '=' sign देऊन त्यापुढे लिहिली.
अशी...
👇
【67】=【60】+【】

【67】=【60】+【】
त्यांनतर Units ची (7) प्रतीके उचलली व '+'sign च्या पुढील चौकटीत ठेवली.
माझी पुन्हा वरीलप्रमाणेच सुचना... "Read the number & write it in your notebook..!"
मुलांनी Units प्रतीके मोजली व number वहीत लिहिली.
अशी..
👇
【67=【60】+【7】
अशी..

【67=【60】+【7】
अशाप्रकारे
【67】=【60】+【7】
असे उदाहरण पोरांच्या वहीत उतरवले गेले.
【67】=【60】+【7】
असे उदाहरण पोरांच्या वहीत उतरवले गेले.
पुढे पोरांना त्यांच्याच मनाने 11 ते 99 पर्यंतच्या कोणत्याही संख्या वहीत लिहून प्रतिकांच्या मांडणीतून संबंधित numbers चे expanded form लिहायला सांगितले.
....काय आश्चर्य !!!
सुरुवातीला प्रतीके वापरून expanded forms लिहणारे हे 1ली 2रीतले चिमुकले प्रतिकांशिवाय उदाहरणे सोडवायला लागले.
[2/22, 10:35 PM] Gajanan Bodhe: या ठिकाणी मुलांचं पूर्वज्ञान होतं 1 ते 99 पर्यंतच्या संख्या (1 UNIT 1-One...2 Units 2-Two.......1 Tens 0 Units 10-Ten,,,,1 TENS 1 UNITS 11-Eleven,,,1 TENS 2 UNITS 12-Twelve)......9 Tens 9 Units 99 -Ninety Nine याप्रमाणे) वाचता व लिहिता येणे...

अशा पद्धतीने Numbers Reading चा सराव झालेला असल्याने मुलांना Places व त्या place वर असलेल्या digit ची value (Place Value हा संबोध) समजलेली होती... या पुर्वज्ञानाच्या आधारे Expandrd Form सहज समजला मुलांना.
....1 लीतल्या वैभव,साक्षी, अश्विनी ने लगेच 【】=【】+【】+【】
या रेखाटनाच्या मदतीने H T U प्रतीके वापरून तीन अंकी संख्येचा EXPANDED FORM लिहून दाखवला.
शाळा सुटण्याची वेळ झाली होती मी खिडक्या बंद करायला लागलो तर...
"मज्जा येत आहे सर आम्हाला... शाळा सोडू नका ना please..!"....असे उद्गार मुलांच्या तोंडून निघाले..!
"मज्जा येत आहे सर आम्हाला... शाळा सोडू नका ना please..!"....असे उद्गार मुलांच्या तोंडून निघाले..!
1 लीतील 5 पैकी 4 मुलांना व 2 रीतील 6 पैकी 5 मुलांना दशकोटीपर्यंतच्या संख्या वाचता व लिहिता येतात.
Watch video
Watch video
दुसरीतल्या 'वैभव'कडून मिळालेला 'उत्कृष्ट शिक्षक' पुरस्कार.
दिनांक २० फेब्रुवारी २०१६,शनिवार.
"सर,मपल्याकडून (माझ्याकडून) तुम्हाला हा red pen गिफ्ट...!" - वैभव पांडे, इ १ ली...
मी- "कशाबद्दल रे ?"
मुलं स्वतः शिकत आहेत ..Addition & Subtraction..!
मुलं स्वतः शिकत आहेत ..Addition & subtraction। |
---|
सहज शाळाभेटीदरम्यान आलेल्या पाहुण्यांकडून झाले कौतुक लेकरांच्या शिकण्याचे!
(पुढील पोस्ट २६ मार्च २०१६ रोजी माझ्या जुन्या ब्लॉगवर प्रसारित केलेली होती.)
गत दोन दिवसांपूर्वी आमच्याच केंद्रातल्या एका शाळेतील सहशिक्षिका मुलांचे आतापर्यंतचे शिकणे समजून घेण्यासाठी माझ्या शाळेत आल्या होत्या. योगायोगाने विठ्ठलभाऊ (विठ्ठलराव वहाटुळे...वस्तीतील एक प्रतिष्ठित नागरिक) शाळेत काही कामानिमित्त आलेले. त्यावेळी आतापर्यंत मुलं जे काही शिकलीत त्याचे प्रात्यक्षिक मुलांच्या कृतियुक्त सहभागातून मी शाळाभेटीला आलेल्या त्या मॅडमना दाखवत होतो. विठ्ठलभाऊ कुतूहलाने हे सारं बघत होते. इयत्ता १ ली ची मुलं दशकोटीपर्यंतच्या संख्या सहज वाचत होती.. इतकेच नाही तर दिलेल्या कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकांच्या स्थानिक किंमती सांगणे व लिहिणे. विस्तारित रूपात संख्येची मांडणी करणे.. दिलेल्या दोन संख्यांमध्ये तुलना करून लहानमोठेपणा ठरवणे. योग्य संकेतचिन्हे वापरून संख्यामध्ये केलेली तुलना वाचून दाखवणे. हातच्याची व बिनहातच्याची बेरीज व वजाबाकी करणे. दिलेल्या संख्येच्या मागची व पुढची संख्या अचूक सांगता येणे. चढता उतरता क्रम. संख्यांची कहाणी तयार करणे. इत्यादी कृती मुलं सहज व सफाईदारपणे करत होती. हे सारं बघून विठ्ठलभाऊ प्रभावित झाल्याचे दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव सहज उमटून दिसत होते. अशाप्रकारे आपल्या व्यस्त दिनचर्येतून सवड काढत कधी नव्हे ते त्यादिवशी माझ्या शाळेत तब्बल एक तास बसून आमच्या विद्यार्थ्यांचे शिकणे त्यांनी अनुभवले. शाळाभेटीला आलेल्या मॅडमसह विठ्ठलभाऊंनीदेखील मुलांचे व आम्हा गुरुजींच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले होते. ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● या पार्श्वभूमीवरच आजचा प्रसंग इथे share करावासा वाटतोय. ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●सध्या सकाळ पाळीत शाळा सुरू आहेत. नेहमीप्रमाणे आज १२.३० वाजता शाळा बंद करून मुलं आणि आम्ही दोन्ही शिक्षक घरी जायला निघालो.दुचाकीवर बसलो देखील..(आम्ही निघेपर्यंत एकही विद्यार्थी घरी जात नाही..निघताना bye करण्याची सवय मुलांना लागलेलीय..त्यामुळे सर्वजण आम्ही निघण्याची वाट पाहत शाळेच्या आवारातच थांबलेली होती.) तितक्यात वर ज्यांचा उल्लेख केलाय ते विठ्ठलभाऊ वहाटुळे एका पाहुण्याला सोबत घेऊन शाळेच्या आवारात आले व म्हणाले, "आमच्या पाहुण्याला आपल्या शाळेत चाललेला कार्यक्रम दाखवा बरं सर..!" (मुलांच्या सुलभ शिकण्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या आमच्या कामाचा उल्लेख विठ्ठलभाऊंनी 'कार्यक्रम' असा केलेलाय...) अण्णासाहेब फुके असे त्या पाहुण्याचे नाव असून मूळ गाव टाकळी. (माझ्या शाळेची वस्ती टाकळी गावाचाच भाग). औरंगाबाद येथील एका खासगी माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. विठ्ठलभाऊंच्या म्हणण्याला प्रतिसाद देत आम्ही दोन्ही गुरूजी बसल्या गाडीवरून उतरलो अन् पोरांना वर्गाची दारे उघडायला सांगितली. पोरंही जाम खुश होती...(जिल्हा नियोजनानुसार गत सोमवारी शेजारील तालुक्याच्या शिक्षकांनी केलेल्या शाळाभेटीच्या पार्श्वभूमीवर मुलांना मी तसे सांगूनच ठेवलेलेय कि यापुढे तुमचे शिकणे बघण्यासाठी कोणीही कधीही येऊ शकेल..तेव्हा तुम्ही या साऱ्या प्रसंगांना आत्मविश्वासाने सामोरं जायला हवं... त्यामुळेही मुलांना आंनद झालेला असावा कदाचित..असो!) दोन दिवसांपूर्वी मुलांनी आतापर्यंत शिकलेल्या ज्या ज्या बाबींचे सादरीकरण शाळाभेटीला आलेल्या मॅडमसमोर केले होते त्याच बाबी आज आलेल्या पाहुण्यासमोरही (अण्णासाहेब फुके सरांसमोर) केले. आत्मविश्वासाने मुलांनी आतापर्यंत शिकलेल्या सर्व बाबी त्यांच्यासमोर मांडल्या. हे सारं पाहून अण्णासाहेब फुके सर अचंभित झाले व मुलांचे कौतुक म्हणून खूष होऊन १०० रुपयांची नोट माझ्या हाती त्यांनी टेकवली आणि म्हणाले, "मुलांसाठी माझ्याकडून उद्या खाऊ घेऊन या..!" मुलांना मी ती नोट दाखवून म्हटले, "या सरांनी दिलेल्या या १०० रुपयातुन तुमच्यासाठी काय आणू...?" मुलं म्हणालीत, "सर,आम्हाला नकोत ते पैसे..आम्हाला खाऊदेखील नकोय..!" "मग काय करू या पैशाचं तुम्हीच सांगा..!" ....मुलांना मी केलेला प्रश्न. "सर,तुम्ही रविवारच्या वर्गाला येताना गाडीत पेट्रोल टाकून आणा...!" -मुलांचा प्रतिसाद. .....गेल्या काही दिवसांपासून मी रविवारी वर्ग घेतोय याची जाणीव मुलांना असल्याचे पाहून बरे वाटले...रविवारी वर्ग घेतोय म्हणून त्यासाठी येणारा गाडीचा पेट्रोल खर्च मुलांच्या कौतुकापोटी कोणी दिलेल्या रकमेतुन निश्चितच मी करणार नाही...मीच काय काम करणारा कोणताच गुरूजी असा विचार कदापि करणार नाही. आतापर्यंत माझ्या सवडीप्रमाणे ज्या ज्या रविवारी वर्ग घेतलेले आहेत त्या त्या प्रत्येक रविवारी मुलं आंनदाने हजर राहताहेत...मी दिलेल्या वेळेआधीच मुलं शाळेच्या आवारात येऊन राहतात. माझ्या लहानपणीही माझे प्राथमिक शाळेतले गुरुजी रविवारी तसेच दिवाळीच्या सुट्टयांतदेखील वर्ग घेत असल्याचे आठवतेय...पण त्या वर्गांना उपस्थित राहण्याची सक्ती व धाक असायचा...इच्छा असो वा नसो हजर राहावंच लागायचं...कारण नाही उपस्थित राहिलं वर्गाला कि हातावर वळ उमटेपर्यंत 'रूळ' बसायचे हमखास... शिक्षेच्या भीतीपोटी/शिक्षा टाळण्यासाठी नाईलाजाने सुट्टीच्या दिवशीचे वर्ग करत होते बहुतांश विद्यार्थी. ...पण माझ्या विद्यार्थ्याना आंनद वाटतोय सुट्टीच्या दिवशीही शाळेत येण्याचा...! कोणताही धाक नाही कि सक्ती नाही...! यालाच शाळेविषयीची आवड किंवा ओढ म्हणत असावे कदाचित... नाही का..? feeling very happy & proud with my students......
आम्ही इंग्रजी असे शिकतो...
इयत्ता ४ थी व ५ वीत शिकत असलेले माझे विद्यार्थी इंग्रजी विषयाचा अभ्यास पुढीलप्रमाणे करतात.
१.सम्बंधित इयत्तेतील सर्व विद्यार्थी त्या इयत्तेचा शब्दकोष (Reader) व पाठ्यपुस्तक घेवून चटईवर गट करून वर्तुळाकार बसतात.(प्रत्येक वर्गाची पटसंख्या सरासरी 6-7 अशी असल्याने प्रत्येक इयत्ता म्हणजे एक गट सहज बनतो)
२.पाठ्यपुस्तकातील गद्यपाठाचे वाचन करतात.
३.पाठाचे पूर्ण वाचन झाल्यानंतर परत एक एक वाक्य वाचून त्यातील अर्थ न समजलेले शब्द शब्द्कोशात शोधतात.
जे शब्द त्यांच्याजवळील शब्द्कोशात नसतील ते वहीत तक्त्याच्या स्वरूपात (word board activity) लिहितात व त्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी माझ्याकडे येतात.
४.Word board मधील शब्दांचा अर्थ माझ्याकडून समजून घेतल्यानंतर वहीत लिहून घेतात. या व शब्द्कोशातील शब्दांच्या अर्थांच्या आधारे पाठातील प्रत्येक वाक्यांचा अर्थ स्वतः लावतात व मला सांगतात...जिथे चुक झाली तिथेच शक्यतो त्यांच्याच मदतीने दूर करण्याचा माझा प्रयत्न असतो...आणि अनुभव असा आहे की मुलेच परस्परांच्या मदतीने चुक दुरुस्ती करून घेतात...क्वचितच ते याकामी माझी मदत घेतात.
५.पाठातील प्रत्येक वाक्यांचा अर्थ सांगून झाल्यानंतर परत सबंध पाठ वाचून काढतात...व पाठाचा समग्र आशय कथन करतात.
गतवर्षी या विद्यार्थ्यांना हसत खेळत ताणविरहित वातावरणात gramatical sentence constructionsसुत्रांच्या मदतीने अर्थपूर्ण वाक्यनिर्मितीचा सराव करून घेतला होता...त्याचे उपयोजन पाठातील वाक्यांचा अर्थ आणि एकंदरीत संपूर्ण पाठ समजून घेण्यासाठी माझे विद्यार्थी करीत आहेत असे माझे निरिक्षण आहे.
*गतवर्षी विद्यार्थ्यांनी अर्थपूर्ण वाक्यनिर्मितीसाठी पुढील Gramatical Senetense Construction सूत्रे अभ्यासली होती.*
१.S+V1+O
२.S+V2+O
३.S+shall/will+V1+O
४.S+is/am/are+V4+O
५.S+was/were+V4+O
६.S+shall be/will be+V4+O
७.S+has/have+V3+O
८.S+had+V3+O
९.S+shall have/will have+V3+O
१०.S+has been / have been+V4+O
११.S+had been+V4+O
१२.S+shall have/will have+been+V4+O
ही सूत्रे शिकत असताना विद्यार्थ्यांना ताण येणार नाही याची पुरेपुर काळजी मी घेतली होती.याबाबत सविस्तर वर्णन पुढे दिलेले आहे.
गतवर्षी इयत्ता ३री, ४थी व ५वीच्या विद्यार्थ्यांनी एकुण इंग्रजीतील १२ Grammatical Senetense Constructions अभ्यासल्या होत्या.
हा व्याकरणाचा भाग असल्याने प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना नियमादि बाबी समजावून सांगणे तसे अवघड काम असल्याची जाणीव होतीच परंतू इंग्रजी पाठ्यपुस्तकातील गद्यपाठ शिक्षकानेच पारम्पारिक पद्धतीने म्हणजे शब्दार्थ लिहून देवून ते मुलांना घोकंपट्टी करायला सांगणे तथा समग्र पाठाचे स्वतःच भाषांतर करून आशय कथन करण्यापेक्षा वा समजावून सांगण्यापेक्षा विद्यार्थ्यांनाच स्वयंअध्ययन करून शब्दांचे अर्थ शब्दकोशातुन स्वतः शोधण्याची व तो पाठ/घटक समजून घेण्याची/समजावून सांगण्याची सवय लागली तर ते भाषा शिकण्या/समजून घेण्याच्या अंगाने अधिक परिणामकारक ठरेल असे मला वाटले व पूर्ण विचारांती इंग्रजी वाक्यरचनेची १२ सूत्रे (Sentence Construction formulae /Tenses) शिकण्यास / समजून घेण्यास व त्यायोगे वाक्यनिर्मिती करता येण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम मी हाती घेतले.हे करत असताना व्याकरणातील कोणत्याच संज्ञांचा (SUBJECT,OBJECT, VERB इत्यादि..) उल्लेख मुद्दाम करायचा नाही असे ठरवले.शिकणं निरस व कंटाळवाणं होऊ नये हाच यामागील हेतू.
माझ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासलेली इंग्रजी वाक्यराचनेची १२ सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
त्यातील पाहिले सूत्र [ S+V1+O ] शिकण्यासाठी वर्गात केलेल्या प्रयत्नांचा विस्तृत उहापोह या post मध्ये करीत आहे...आपले अभिप्राय अपेक्षित आहेत.
---------------------------------------------------
Sentence construction formulae

यातील पहिली रचना (S+V1+O) आम्ही अशी शिकलोत.
सर्वप्रथम मुलांना माहीत असलेले मुख्य कृती/क्रियादर्शक इंग्रजी शब्द (मुख्य क्रियापदाचे पहिले रूप-V1) मराठी अर्थासह (त्यांनाच विचारून) एका खाली एक अशा क्रमाने फळ्य़ावर लिहून घेतले.
उदाहरणार्थ-
---------------
[V1]
---------------
eat/eats ,-खातो/खाते/खातात
go/goes ,-जातो/जाते/जातात
write/writes,-लिहितो/लिहिते/लिहितात
read/reads,-वाचतो/वाचते/वाचतात
walk/walks-चालतो/चालते/चालतात
Come/comes-येतो/येते/येतात
Play/plays-खेळतो/खेळते/खेळतात
Drink/drinks-पितो/पिते/पितात
make/makes-बनवतो/बनवते/बनवतात
Take/takes-घेतो/घेते/घेतात
Cut/cuts-कापतो/कापते/कापतात
Open/opens-उघडतो/उघडते/उघडतात
Close/closes-बंद करतो/करते/करतात
मुद्दाम eat म्हणजे 'खाणे' ऐवजी 'खातो/खाते/खातात'...go म्हणजे 'जाणे' ऐवजी 'जातो/जाते/जातात' याप्रमाणे सर्व क्रियादर्शक शब्दांचे (V1s चे) अर्थ फळ्यावर लिहिलेले होते. त्यामुळे अर्थपूर्ण वाक्यनिर्मिती करणे सोपे जाणार होते कारण वाक्ये लिहिताना वा बोलताना आपण 'खाणे' किंवा 'जाणे' असे शब्दप्रयोग करीत नाही.
वरीलप्रमाणे यादी करून "ह्या सर्व शब्दांना V1 म्हणायचं"..असे सांगितले आणि शीर्षस्थानी "V1" लिहून सबंध यादी चौकटीत बंद केली...
आता वरील शब्दांच्या संदर्भाने मी काही प्रश्न मुलांना विचारले.त्यापैकी एक पुढे दिला आहे.
उदाहरणार्थ-
१.'कोण' जातो ?
....(मुलांचे उत्तर- 'मी' जातो...'तो' जातो...ती जाते...ते जातात...'रवी' जातो...आरती जाते...आम्ही जातो...)
...मग मी 'मी' साठी इंग्रजी प्रतिशब्द 'I' फळ्य़ावर लिहिला.
(अर्थातच मुलांना परिचित असलेल्या शब्दांचीच एकाखाली एक अशी क्रमवार यादी करून शीर्षस्थानी 'S' लिहिले व सबंध यादी चौकटीत बंद केली.
मुलांनी " 'कोण' जातो ? "या प्रश्नाचे उत्तरादाखल सांगितलेल्या सर्व मराठी शब्दांना इंग्रजी प्रतिशब्दांसह तयार केलेली नमुना यादी पुढे देतोय.
-------------
*[S]*
--------------
मी-I
तो-He
ती-She
ते/त्या/ती-They
आम्ही/आपण-We
रवी-मुलाचे/माणसाचे नाव
आरती-मुलीचे/स्त्रीचे नाव
इ
त्या
दि.
अशाप्रकारे आता फळ्यावर *'V1' व 'S'* या दोन शब्दयाद्या लिहिल्या गेल्या.
आता फळ्यावर *S+V1+O* हे सूत्र लिहिले आणि मुलांना वर लिहिलेल्या *'S' व 'V1'* च्या यादीतील शब्द या सूत्रात योग्य क्रमाने लिहायला सांगितले.
मुलांनी सुत्रातील क्रमानुसार *S व V1* च्या यादीतून योग्य शब्द निवडून अचूक वाक्यरचना केली.
पण O च्या जागी काय लिहायचे हे आधी सांगितलेले नसल्याने मुले थांबलीत..'O' म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी मी *'S+V1'* या क्रमाने विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या अपूर्ण वाक्याच्या अनुशंगाने एक प्रश्नावली तयार केली.त्यातील एक प्रश्न उदाहरणादाखल पुढे देतोय.
मुलांनी *[S+V1]* या शब्दक्रमाने लिहिलेले वाक्य होते.
*I go*...(मी जातो/जाते.)
मी विचारलेला प्रश्नावलीतील मराठी प्रश्न होता..."'कोठे' जातो ?"
मुलांनी विविध उत्तरे दिलीत.
उदा.शाळेत जातो/जाते.
बाजारात जातो/जाते/
कायगावला जातो/जाते...इत्यादि.
ज्यावेळी पहिले उत्तर आले 'शाळेत जातो/जाते' तत्क्षणीच मी
फळ्यावर *I go*नंतर *to school*..हा शब्दसमुह लिहिला.(to,for,at,on,in under....इत्यादि prepositions चे अर्थ वेळोवेळी कृतियुक्त अध्ययन अनुभवांच्या माध्यमातून पहिल्या सत्रातच स्पष्ट केलेले होते...याविषयी स्वतंत्र लिहिनच.)
आता फळ्या वर वाक्य लिहिले गेले...
*I go to school*....(मी शाळेत जातो/जाते किंवा शाळेला जातो/जाते.)
मग मी मुलांना विचारले,"सूत्रात बघून मला सांगा या वाक्यातील *'to school'* या शब्दसमुहाला आता तुम्ही काय म्हणाल ?"
मला अपेक्षित असलेले उत्तर मुलांकडून आले,"सर, *'to school'* हा या सुत्रातील *'O'* आहे."
इथे मुलांचे पूर्वज्ञान होते...फळ्यावरील *'S'* व *'V1'* यादीतील शब्द.
त्यामुळे सुत्राखाली लिहिल्या गेलेल्या वाक्यातील *I*(S) *go* (V1) नंतर लिहिलेला to school हा शब्दसमूह नक्कीच *'O'* असणार हे त्यांना निरिक्षणातून लक्षात आले होते.
त्यानंतर वरील वाक्यात *V1* (go) व *O* *(to school)* कायम ठेवून केवळ' I 'बदलून S च्या यादीतील दुसरे शब्द वापरून विद्यार्थ्यांना वाक्यरचना करावयास सांगितले.
विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे वाक्ये लिहिलीत.
१.I go to school....मी लिहून दाखवलेले मुळ वाक्य.
२.He goes to school....विद्यार्थ्यांनी मी लिहिलेल्या मुळ वाक्यातील ' I ' हा *'S'* बदलून त्याजागी ' *He* ' हा *S* वापरून लिहिलेले वाक्य.
*३*.She goes to school....(She चा वापर)
*४*.They go to school...(They चा वापर)
*५*.Ravi goes to school.(मुलगा/पुरुषाच्या नावाचा वापर)
*६.*Arati goes to school.(मुलगी/स्त्रीच्या नावाचा वापर)
याप्रमाणे विविध इंग्रजी वाक्ये मराठी भाषांतरासह लिहिली.
[ यात *go* व *goes* किंवा *cut व cuts* यापैकी कोणते रूप कोणत्या *S* पुढे वापरायचे हे समजण्यासाठी आधीच काही तक्ते तयार करून मुलांना अभ्यासण्यासाठी दिलेले होते.
उदाहरणार्थ-
*I go / I cut*
*You go / You cut*
*We go / We cut*
*They go / They cut*
*He goes / He cuts*
*She goes / She cuts*
*It goes / It cuts*
*Ravi goes / Ravi cuts*
*Aarati goes / Aarati cuts ]*
त्यानंतर वाक्यातील *S* कायम ठेवून *V1* व वाक्याला अर्थपूर्णता येईल असा *'O'* वापरून विद्यार्थ्यांकडून नियमितपणे वाक्यनिर्मिती करून घेत गेलो.मुले आनंदाने हे सारं करीत होती...अर्थपूर्ण वाक्य लिहिलेल्या वह्या रोज मला दाखवित होती...आताही हा नित्यक्रम सुरूच असतो...आनंदाने शिकलोत आम्ही _*S+V1+O*_ही पहिली वाक्यरचना...आणि त्यापुढील उर्वरित ११ वाक्यरचनाही..!
पाठ्यपुस्तकातील *मुख्य क्रियापदे [V1] व त्यांची उर्वरित ३ रूपे *[..V2..V3..V4]*यांचेही तक्ते मी स्वतः तयार केले तसेच विद्यार्थ्यांकडूनही तयार करून घेतले..वर्गाच्या भिंतीवर डकवले...रोज वर्गात आल्यावर फावल्या वेळेत माझे विद्यार्थी या तक्त्यातील शब्द अभ्यासतात..व उर्वरित ११ वाक्यरचनेच्या सुत्रांच्या मदतीने अर्थपूर्ण वाक्यांची निर्मिती करतात...पाठ्यपुस्तकात असलेल्या गद्यपाठातील वाक्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी व एकंदरीत सबंध पाठाचा आशय समजण्यासाठी शिकलेल्या या साऱ्या बाबींचा उपयोग त्यांना होत आहे...हे मी सध्या अनुभवतोय.
अभिप्रायाच्या प्रतिक्षेत-
गजानन बोढे,सहशिक्षक, जि.प.प्रा.शा.भानुसेवस्ती, ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद.*

Subscribe to:
Posts (Atom)