-->
MY SCHOOL
ZPPS MAKTA CRC.BHANGARAM TALODHI BRC.GONDPIPARI ZP.CHANDRAPUR
नमस्कार
HERE YOU WILL GET TO READ & WATCH LEARNING EXPERIENCES FROM MY CLASSROOM WITH THEIR EXPECTED OUTCOMES...ALSO YOU WILL GET EDUCATIONAL CONTENT IN THE FORM OF PDF BOOKS,PPTX FILES,VIDEOS,AUDIOS.. etc.

Saturday, August 12, 2017

आम्ही इंग्रजी असे शिकलो..(१२/०८/२०१६ ची फेसबुक पोस्ट)


मागील वर्षात आजच्याच दिवशी 4 थी व 5 वीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी शिकणे फेसबुक वर प्रसारित केले होते...तीच पोस्ट इथे देतोय
यंदा ४ थी व ५ वीत शिकत असलेले माझे विद्यार्थी इंग्रजी विषयाचा अभ्यास पुढीलप्रमाणे करतात.
 १.सम्बंधित इयत्तेतील सर्व विद्यार्थी त्या इयत्तेचा शब्दकोष (Reader) व पाठ्यपुस्तक घेवून चटईवर गट करून वर्तुळाकार बसतात.(प्रत्येक वर्गाची पटसंख्या सरासरी 6-7 अशी असल्याने प्रत्येक इयत्ता म्हणजे एक गट सहज बनतो)
 २.पाठ्यपुस्तकातील गद्यपाठाचे वाचन करतात.
 ३.पाठाचे पूर्ण वाचन झाल्यानंतर परत एक एक वाक्य वाचून त्यातील अर्थ न समजलेले शब्द शब्द्कोशात शोधतात. जे शब्द त्यांच्याजवळील शब्द्कोशात नसतील ते वहीत तक्त्याच्या स्वरूपात (word board activity) लिहितात व त्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी माझ्याकडे येतात.
 ४.Word board मधील शब्दांचा अर्थ माझ्याकडून समजून घेतल्यानंतर वहीत लिहून घेतात. या व शब्द्कोशातील शब्दांच्या अर्थांच्या आधारे पाठातील प्रत्येक वाक्यांचा अर्थ स्वतः लावतात व मला सांगतात...जिथे चुक झाली तिथेच शक्यतो त्यांच्याच मदतीने दूर करण्याचा माझा प्रयत्न असतो...आणि अनुभव असा आहे की मुलेच परस्परांच्या मदतीने चुक दुरुस्ती करून घेतात...क्वचितच ते याकामी माझी मदत घेतात.
 ५.पाठातील प्रत्येक वाक्यांचा अर्थ सांगून झाल्यानंतर परत सबंध पाठ वाचून काढतात...व पाठाचा समग्र आशय कथन करतात. गतवर्षी या विद्यार्थ्यांना हसत खेळत ताणविरहित वातावरणात gramatical sentence constructions सुत्रांच्या मदतीने अर्थपूर्ण वाक्यनिर्मितीचा सराव करून घेतला होता...त्याचे उपयोजन पाठातील वाक्यांचा अर्थ आणि एकंदरीत संपूर्ण पाठ समजून घेण्यासाठी माझे विद्यार्थी करीत आहेत असे माझे निरिक्षण आहे. 
*गतवर्षी विद्यार्थ्यांनी अर्थपूर्ण वाक्यनिर्मितीसाठी पुढील Gramatical Senetense Construction सूत्रे अभ्यासली होती.*
 १.S+V1+O
 २.S+V2+O
३.S+shall/will+V1+O
 ४.S+is/am/are+V4+O
५.S+was/were+V4+O
६.S+shall be/will be+V4+O
७.S+has/have+V3+O
८.S+had+V3+O
९.S+shall have/will have+V3+O
१०.S+has been / have been+V4+O
११.S+had been+V4+O
१२.S+shall have/will have+been+V4+O
 ही सूत्रे शिकत असताना विद्यार्थ्यांना ताण येणार नाही याची पुरेपुर काळजी मी घेतली. कशी ते लवकरच लिहितो...तूर्तास थांबतो. 

No comments:

Post a Comment

आपला अभिप्राय लिहा...