-->
MY SCHOOL
ZPPS MAKTA CRC.BHANGARAM TALODHI BRC.GONDPIPARI ZP.CHANDRAPUR
नमस्कार
HERE YOU WILL GET TO READ & WATCH LEARNING EXPERIENCES FROM MY CLASSROOM WITH THEIR EXPECTED OUTCOMES...ALSO YOU WILL GET EDUCATIONAL CONTENT IN THE FORM OF PDF BOOKS,PPTX FILES,VIDEOS,AUDIOS.. etc.

Sunday, August 6, 2017

इयत्ता २ री (सेमी इंग्रजी). घटक-SLIDING & ROLLING.

सदर अध्ययन अनुभव आपणास कसा वाटला ते या पोस्टच्या तळाशी असलेल्या Comment box मध्ये लिहा please...
इयत्ता २ री (सेमी इंग्रजी).
घटक-SLIDING & ROLLING.
.................................................
इयत्ता २ रीच्या गणित पाठ्यपुस्तकात असलेले FLAT surface व CURVED surface हे संबोध विविध वस्तुंच्या सहाय्याने पोरांना आधीच समजावून सांगितले होते. पूर्वज्ञानाचा हाच धागा पकडून आपण आता काय शिकणार आहोत याची पूर्वकल्पना न देता मधल्या सुट्टीत घसरगुंडीजवळ खेळत असलेल्या लेकरांजवळ गेलो.इयत्ता २ रीतील पोरांपैकी  एकाला घसरगुंडीवर चढण्यास सांगून आधी पुस्तक (an object with FLAT surface) घसरपट्टीवरून खाली सोडण्याची सुचना केली.
 त्यानंतर एक खडू (an object with CURVED surface) आडवा ठेवून घसरपट्टीवरुन सोडण्यास सांगितले.या दोन भिन्न surfaces असलेल्या वस्तुंच्या घसरपट्टीवरून खाली येण्याच्या पद्धतीचे निरिक्षण करावयास सागून त्यात काही फरक दिसलाय का ते पोरांना विचारले..पोरं विचार करु लागलीत..शेवटी जीवनने अचूक निरिक्षण नोंदवले.तो म्हणाला,"सर,पुस्तक खाली येताना पट्टीला घासत आले,परंतु खडू मात्र गोल गोल फिरत पट्टीवरुन खाली आला..!"

...यावरुन घसरपट्टीवरुन/उतारावरुन एखादी वस्तू घासत येण्याला SLIDING अन् गोल गोल फिरत येण्याला ROLLING म्हणतात हे सांगितले...सोबतच FLAT surface असलेल्या वस्तू SLIDING करतात अन् CURVED surface च्या वस्तू  ROLLING करतात
हे या कृतीदरम्यान पोरांच्या लक्षात आले ते पुढील प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडूनच काढून घेतल्यामुळे.

Q1-What surface do a BOOK     have?
Ans by students-FLAT surface.
...................................................
Q2-BOOK घसरपट्टीवरुन कशा प्रकारे आले?
Ans by students-SLIDING करत.
...................................................
Q3-What surface do a chalk have?
Ans by students-CURVED surface.
...................................................
Q-4-CHALK घसरपट्टीवरुन कशा प्रकारे आले?
Ans-ROLLING करत.
...................................................
पोरांना हे संबोध समजलेत की नाही याची चाचपणी करण्यासाठी पुढील प्रश्न विचारले.
Q-5-SLIDING करत येणारे OBJECTS सांगा?
Ans by students-कंपासपेटी,फरशीचा तुकडा,वीट,वही...
...................................................
Q5-ROLLING करणारे OBJECTS सांगा.
Ans by students-बॉल,बैलगाडीचे चाक,पाण्याची बॉटल,जेवणाचा डबा,पोळ्या लाटण्याचे लाटणे.
...................................................
...अशाप्रकारे मधल्या सुट्टीत खेळासोबतच पोरांचे 'शिकणे'ही घडले.

1 comment:

  1. वरील अध्ययन-अनुभव कसा वाटला ते कळवा प्लीज...

    ReplyDelete

आपला अभिप्राय लिहा...