मी मराठीत प्रश्न विचारले आणि २ रीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे इंग्रजीत भाषांतर केले.
Direct method सह Structural method ने माझे २ री ते ५वीचे विद्यार्थी इंग्रजी शिकत आहेत.
यापूर्वी २रीतील माझे विद्यार्थी S+V1+O व S+is/am/are+V4+O हे sentence structures शिकलेले आहेत.
आतापर्यंत इंग्रजी भाषेतील त्यांच्याच पाठयपुस्तकातील ४५ मुख्य क्रियापदे (V1) व त्यांचे चौथे रूप (V4) २रीतल्या विद्यार्थ्यांना मराठी अर्थासह माहीत आहेत.
पूर्वज्ञानाचा हाच धागा पकडून वरील दोन्ही वाक्यरचना शिकण्यास मी त्यांना मदत केलेली आहे.
तसेच
चालू वर्तमानकाळातील WH+is/am/are+V4+? हा प्रश्नप्रकारदेखील त्यांनी शिकलेला आहे.
वरील दोन वाक्यरचना व हा प्रश्नप्रकार संभाषणात ते वापरतातदेखील..(त्यासाठी काही कृतीयुक्त अध्ययन अनुभूतींचे आयोजन मी केले होते त्याचा नमुना विडिओरूपात याआधीच माझ्या ब्लॉग वर share केलेला आहे तो बघता येईल)
आणि
आज त्यांनी DO/DOES+S+V1+? हा साध्या वर्तमानकाळातील प्रश्नप्रकार शिकण्यास सुरुवात केलीय.
दैनंदिन अध्यापनादरम्यान असे प्रश्न विद्यार्थ्यांना मी विचारत होतोच व सातत्याने विचारत आहे...विद्यार्थी अचूक प्रतिसादही देत होते व देत आहेत.
तेच अनौपचारिक प्रश्न आज structure मध्ये बसवण्याचा प्रयत्न केलाय.
आजचा विडिओ ध्वनिचित्रमुद्रित करण्यापूर्वी हे structure शिकण्यासाठी नेमकी काय पूर्वतयारी केली होती ते लवकरच सविस्तर लिहितो.
khupch chan sir.
ReplyDeleteमनापासून धन्यवाद एकनाथ सर.
ReplyDeleteखूप खूप छान सर
ReplyDeleteमनःपूर्वक आभार.
ReplyDelete