-->
SULABHAK GAJANAN-THE FACILITATOR
MY SCHOOL
ZPPS MAKTA CRC.BHANGARAM TALODHI BRC.GONDPIPARI ZP.CHANDRAPUR
नमस्कार
HERE YOU WILL GET TO READ & WATCH LEARNING EXPERIENCES FROM MY CLASSROOM WITH THEIR EXPECTED OUTCOMES...ALSO YOU WILL GET EDUCATIONAL CONTENT IN THE FORM OF PDF BOOKS,PPTX FILES,VIDEOS,AUDIOS.. etc.
Thursday, September 14, 2017
दोन वर्षांपूर्वी हे विद्यार्थी दुसरीत होते..मध्यान्ह भोजन आटोपल्यानंतर खेळण्यासाठी त्यांनी दोऱ्या मागितल्या होत्या..त्यांचं खेळणं कार्यालयीन खोलीत बसून मी बघत होतो.
तेवढ्यात एक कल्पना सुचली ती अशी-
दुसरीच्या गणित पाठ्यक्रमात असलेला 'रेषा' हा घटक शिकवण्यासाठी खेळण्यातील या दोरीचा एक उत्तम शैक्षणिक साहित्य म्हणून वापर होऊ शकतो असे वाटले.
मग काय,
उठलो खुर्चीतून आणि सुचलेली कल्पना प्रत्यक्षात आणली ती पुढीलप्रमाणे-
१.दोरीची दोन टोके ताणून धरायला सांगितली आणि तयार झालेल्या आकृतीला म्हटले...Straight Line.
२.ताणलेली दोरी उभी धरली आणि तयार झालेल्या आकृतीला म्हटले ...Vertical Line.
३.ताणलेली दोरी आडवी धरली आणि तयार झालेल्या आकृतीला म्हटले ...Horizontal Line.
४.ताणलेली दोरी तिरपी धरली आणि तयार झालेल्या आकृतीला म्हटले ...Slanting Line.
४.ताणून धरलेली दोरी सैल सोडायला सांगितली आणि तयार झालेल्या आकृतीला म्हटले... Curved Line.
अशा प्रकारे या मुलांचं खेळासोबतच 'रेषा व रेषांचे प्रकार' या घटकाचं शिकणंही घडलं!!
आवडलं ना आमचं असं शिकणं ?
No comments:
Post a Comment
आपला अभिप्राय लिहा...
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
आपला अभिप्राय लिहा...